शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नोटाबंदीचा दिवस ‘काळा दिन’ इचलकरंजीत मोर्चा, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:35 IST

इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात ...

ठळक मुद्देभाजप वगळता सर्वपक्षीयांचा समावेशआर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते

इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात येथील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने केली. तसेच मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते. मात्र, ३६५ दिवस उलटले तरी त्यामध्ये सुधारणा झाली नाही. काळा पैसा नष्ट होईल, दहशतवादी कारवाया थांबतील, भ्रष्टाचार कमी होईल, अशा अनेक वल्गना केल्या होत्या. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. उलट या निर्णयामुळे देशाच्या बॅँकिंग व्यवस्थेवर मोठा ताण आला. पैसे बदलण्यासाठी रांगेत राहून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासह अनेक विपरीत परिणामांना जनतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे या तुघलकी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त हा दिवस काळा दिन म्हणून पाळावा लागत असल्याचे विरोधकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, सदा मलाबादे, आदींची भाषणे झाली. आंदोलनात सयाजी चव्हाण, प्रकाश मोरे यांच्यासह राष्टÑीय कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, माकप, भाकप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सर्व श्रमिक संघ, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.कबनुरात निषेधकबनूर (ता. हातकणंगले) येथील विविध पक्ष व संघटना यांच्यावतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच मंडल अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.निवेदनात, मोदी शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशवासीयांना मोठी हानी पोहोचविली आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे या हुकूमशाही शासनाचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी अशोक कांबळे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, राहुल कांबळे, बी. जी. देशमुख, नीलेश पाटील, बबन केटकाळे, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.